लंडन- ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिवाळा वाढला असून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीने रस्त्यावर, इमारतींवर बर्फाची चादर पांघरली गेली आहे.
विविध शहरातील ऐतिहासिक स्थळांवर, पुतळ्यांवरही हा पांढरा थर चढला असून उद्यानांमधील झाडांवर चढलेल्या थरामुळेही उद्याने हिरवीगार दिसण्याऐवजी पांढरीशुभ्र झाली आहेत. या बर्फाचा आनंद घेण्यासाठी अनेक ब्रिटीश नागरिक रस्त्यावर उतरले असून तरूणाई मोकळ्या जागेत बर्फातील खेळ खेळत आहेत. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर महिन्यात इतकी बर्फवृष्टी झाली नव्हती. नाताळच्या काळात ब्रिटनमध्ये बर्फवृष्टी होत असते