संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या मोर्चात तांबे, जयश्री थोरात सहभागी

संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात उपस्थित होत्या. हा मोर्चा आज सकाळी संगमनेरमधील लाल बहादूर शास्त्री चौकातून निघून प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला होता. यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवले पाहिजे यासाठी मागणी केली. या मोर्चावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चाला जयश्री थोरात आणि सत्यजित तांबे एकत्र उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top