मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली. या तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन्ही सकारात्मक स्थितीत आले आहेत.
आजच्या दिवसभराच्या व्यवहारांत सेन्सेक्स ८५५ अंकांनी वाढून ७९,४०८ अंकावर बंद झाला. तर निफ्टी २७५ अंकांच्या वाढीसह २४,१२५ च्या आसपास बंद झाला.बँक निफ्टीमध्ये आज १ हजार अंकांची वाढ झाली. बँक निफ्टीने ५५,४६१ चा सार्वकालिक उच्चांक गाठला. दिवसाअखेर बँक निफ्टी १ हजार अंकांनी वाढून ५५,३०० च्या जवळ बंद झाला.
निर्देशांकामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाल्याने आज प्रामुख्याने तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांसारख्या बँकिंग समभागांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या.
