शेअर बाजारात आता सुरक्षित व्यवहार होणार

मुंबई :

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आज विशेष ट्रेडिंग सत्र घेण्यात आले. त्यात निफ्टीने २२४६२ चा, तर सेन्सेक्सने ७४२२० चा उच्चांक गाठला. आज दोन भागात झालेल्या विशेष व्यवहारात सेन्सेक्स ६१ अंकांनी वाढून ७३८०६ वर तर निफ्टी ४० अंकांनी वाढून २२३७८ च्या पातळीवर बंद झाला. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक्सचेंजेसने तयार केलेल्या डिझास्टर रिकव्हरी साइटच्या चाचणीसाठी हे विशेष सत्र ठेवण्यात आले होते. ही चाचणी यशस्वी झाल्याने शेअर बाजारातील व्यवहार आता सुरक्षित झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top