मुंबई – आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर आज दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी आली. सेन्सेक्स ५९२ अंकांच्या वाढीसह ७६ ,६१२ वर बंद झाला. निफ्टी १६६ अंकांनी वाढला आणि २३,३३२ वर बंद झाला. बँक निफ्टीतही ५२० अंकांची वाढ झाली . तो ५१ ,३४८ वर बंद झाला.
आजच्या तेजीचा सर्वाधिक फायदा रिअल्टी क्षेत्रातील शेअर्सना झाला. त्यामुळे निफ्टी रिअल्टी इंडेक्स ३टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. झोमॅटोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक५ टक्के वाढ झाली, तर टायटन, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्येही वाढ दिसली. तर नेस्ले इंडिया, अल्ट्रा सिमेंट, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, एशियन पेंट्स, एनटीपीसी या शेअर्समध्ये ही घसरण झाली. तर एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि आघाडीच्या आयटी शेअर्समध्ये गुंतवणूक वाढली.
