शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून लवकरच बेस्ट बसेसही धावणार

मुंबई – देशातील सर्वांत जास्त लांबीचा सागरी पूल म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच शिवडी- न्हावाशेवा अटल सेतू गेल्या महिन्यातच सुरू झाला आहे.यामुळे मुंबई ते नवी प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. मात्र,यासाठी प्रवासी वाहनचालकांना २५० रुपये पथकर मोजावा लागत आहे. त्यामुळे आता या अटल सेतूवरून लवकरच सर्वसामान्यांना परवडणारी बेस्ट बसही धावणार आहे. सुरुवातीला ही बस प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार आहे.
अटल सेतूवरून बेस्टने कोकण भवन ते वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतू असा बस मार्ग निश्चित केला असून या मार्गावर एस-१४५ क्रमांकाची बेस्ट बस धावणार आहे.२१.८० किमी लांबीचा शिवडी – न्हावाशेवा सेतूचा १६.५ किमी मार्ग समुद्रावर आहे. या सेतूवरून सध्या सरासरी ३० हजार वाहने धावत आहेत.लवकरच ही संख्या ७० हजारांवर जाईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे.या सेतूमुळे मुंबई-नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटात पार करणे शक्य होत असल्याने या मार्गावर बेस्ट सेवा सुरू करण्याची मागणी सुरुवातीपासून करण्यात येत आहे. त्यानुसार बेस्टनेही अटल सेतूवरून बेस्ट बस सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे.बेस्टच्या चलो अॅपवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, एस-१४५ अशा क्रमांकाची बेस्ट बस अटल सेतूवरून धावण्याची शक्यता आहे. कोकण भवन ते वर्ल्ड सेंटर व्हाया अटल सेतू असा हा बेस्ट मार्ग असण्याची शक्यता आहे. साई, संगण, तरघर, उलवे नोड, आई तरुमाता, कामधेून, ऑकलँडस, अटल सेतू, पूर्वमुक्त मार्ग, सीएसएमटी, चर्चगेट आणि कफ परेड अशी बेस्ट बस धावण्याचीही शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top