शिकागोमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

शिकागो

अमेरिकेतील शिकागो येथे आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. सय्यद मजहीर अली असे हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा हैदराबादचा आहे. या हल्लाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हल्लेखोर सय्यद अली याचा पाठलाग करताना दिसत आहेत.

सय्यद मजहीर अली हा शिकागोच्या इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्याच्या वेस्ट रिज अपार्टमेंटजवळ काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सय्यदने या हल्लादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल केला. हल्लेखोरांनी त्याला मारहाण करत त्याचा मोबाईलदेखील हिसकावून घेतला.
या घटनेनंतर सय्यदच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून विद्यार्थ्याला उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी केली आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांनी सय्यदच्या पत्नीला अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारतीय दूतावासाने सय्यदच्या कुटुंबियांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top