शिकाऊ डॉक्टरांच्या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ

मुंबई- राज्यातील इंटर्न डॉक्टरांच्या मानधनात आता ७ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंटर्न डॉक्टरांना आता पर्यंत ११ हजार रुपयांचे मानधन दिले जात होते. त्यामध्ये आता ७ हाजर रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे राज्यातील इंटर्न डॉक्टरांना १८ हजार रुपये मानधन मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, कूपर व नायर रुग्णालयातील दंत महाविद्यालयातील एकूण ८०३ इंटर्न डॉक्टरांना आता वाढीव मानधन दिले जाणार आहे.
इंटर्न डॉक्टरांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी करण्याची मागणी केली जात होती. ही मागणी मान्य करत महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात इंटर्न डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारने याबबात औपचारिक आदेश देखील जारी केला होता. मात्र, अद्याप मुंबई महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या इंटर्न डॉक्टरांनी संताप व्यक्त करत संपावर जाण्याचा इशारा दिला. यानंतर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्णयाची ताताडीने अंमलबजावणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top