शिंदे, फडणवीस, अजित पवारांना शरद पवारांचे जेवणाचे आमंत्रण

बारामती- बारामतीत होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी या तिघांना ‘गोविंदबागेत जेवायला या`, असे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या या आमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

2 मार्चला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पत्रिकेमध्ये शरद पवार यांचे नाव नाही. त्यात खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हे तिन्हीही पुढारी बारामतीत येणार असल्यामुळे शरद पवारांनी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शरद पवारांच्या आमंत्रण स्वीकारतात का? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top