पुणे – शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे १० दिवसांत तिसऱ्यांदा एकत्र येणार आहेत. सोमवार २१ एप्रिलला पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी ९ वाजता कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वारंवार एकत्र येताना दिसत आहेत. याआधी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात हे दोघे पुन्हा एकत्र आले होते.
