व्हाईटहाऊसच्या जवळ राहूनही हॅरीस यांचे वडील त्यांना भेटत नाहीत

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पार्टीच्या वतीने रिंगणात असलेल्या विद्यमान उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे वडील व्हाईट हाऊसपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर राहतात. मात्र असे असूनदेखील ते आजपर्यंत कधीही हॅरीस यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसवर आलेले नाहीत.हा एक चर्चेचा विषय झाला आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. हॅरीस यांच्यासमोर रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या बारीकसारीक गोष्टींवर अमेरिकेत चर्चा होत आहे. हॅरीस यांच्या वडिलांचे व्हाईट हाऊसवर न येणे हा असाच मुद्दा आहे.हॅरीस यांचे वडील डोनाल्ड जे हॅरीस हे अर्थशास्त्र विषयाचे माजी प्राध्यापक असून ते कट्टर मार्क्सवादी आहेत.त्यामुळेच ते कमला हॅरीस उपराष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही व्हाईटहाऊसवर का गेले नाहीत,असा चर्चेचा सूर आहे.