विस्कॉन्सिन्स -विस्कॉन्सिन्स राज्याच्या सर्वोच्च न्यायालयातील निवडणुकीत ट्रम्प यांच्या विरोधक असलेल्या लिबरल पक्षाच्या सुझान क्रॉफर्ड विजयी झाल्या आहेत. त्यांनी एलन व मस्क यांनी त्यांच्या विरोधात उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव केला.विस्कॉन्सिन्सच्या सर्वाच्च न्यायालयाच्या काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे सहकारी एलन मस्क यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या ब्रैड शिमेल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विजयासाठी ट्रम्प यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. मात्र लिबरल पक्षाच्या सुझान क्रॉफर्ड यांनी त्यांचा पराभव केला आहे. विजयानंतरच्या आपल्या भाषणात त्यांनी म्हटले आहे की, आज विस्कॉन्सिन्सच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. लोकांनी हे दाखवून दिले आहे की, न्याय हा अनमोल आहे. आमची न्यायालये विकाऊ नाहीत.
