विशाल पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

सांगली- सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत वंचितने पाठिंबा दिल्याबद्दल विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
सांगली मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top