विनोद कांबळीची प्रकृतीबिघडली! रुग्णालयात दाखल

ठाणे – भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली. त्याला ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.गेल्या महिन्यात सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीचिन्हाच्या अनावरण सोहळ्यात विनोद कांबळी दिसला होता. त्याची तब्येत ठीक नसल्याचे तेव्हा उघड झाले होते. त्याला नीट बोलताही येत नव्हते. तो हृदयविकारासह इतर आजाराने त्रस्त असून व्यसनाधीनतेमुळे तो अनेकवेळा पुनर्वसन केंद्रातही गेला आहे.कांबळीने आपल्या कारकिर्दीत १०४ एकदिवसीय सामने खेळले. त्यात त्याने २ शतकांसह १४ अर्धशतके झळकावली. त्याने १७ कसोटीत १,०८४ धावा केल्या. कांबळीची तुलना अनेक मोठ्या क्रिकेटपटूंशी केली जात होती. मात्र तो सध्या वाईट काळातून जात आहे.