विनोद कांबळींवर रुग्णालय मोफत उपचार करणार

ठाणे- भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती बिघडल्याने कालच ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान झाले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. विवेक त्रिवेदी यांनी दिली. रुग्णालयाचे प्रभारी एस सिंग यांनी कांबळीला त्यांच्या वैद्यकीय आजीवन मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून आजारी असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.