विक्रोळीच्या स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदाहिनी

*मुंबई महापालिका
१२ कोटी खर्च करणार

मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने प्रदूषणमुक्त मुंबईचा प्रयोग स्मशानभूमीतही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रोळी पार्कसाईट येथील स्मशानभूमीत दोन पीएनजी म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅसवर आधारित शव दाहिनी बसवण्यात येणार आहे.तसेच त्याठिकाणी प्रार्थना सभागृह,संगमरवरी दगडाची आसन व्यवस्था, उद्यान अशा सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका सुमारे १२ कोटी ६७ लाख ४ हजार रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणमुक्त नियमावली जारी केली आहे.त्यानुसार स्मशानभूमीत टायर जाळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी आणि पीएनजी दाहिनी बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विक्रोळी पश्चिम पार्कसाईट येथील २०१५.६५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या वर्षानगर हिंदू स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात दोन पीएनजी दाहिनीसह प्रार्थना सभागृह, संगमरवरी दगडाची आसन व्यवस्था, उद्यान, शौचालय अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १२ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या स्मशानभूमीत तीन लाकडी दाहिनीही आहे.आता आणखी एक लाकडी दाहिनी बसविली जाणार आहे.
देवनार येथील हिंदू स्मशानभूमीतही नैसर्गिक वायूचा वापर करून प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top