वाशी खाडीवरील एक नवीन पूल ऑगस्टमध्ये खुला होणार

मुंबई- सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे येणार्‍या पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असल्याने वाशी खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल.

सायन-पनवेल मार्गावर मानखुर्दहून नवी मुंबईला जोडणारा सहा वाशी खाडी पदरी पूल १९९४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पण, गेल्या काही वर्षांमध्ये या पुलावरची वाहतूक वाढल्यामुळे तो अपुरा पडत होता. यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने या पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर असे प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी २ पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात येणार आहेत. यातील एका पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, तरमानखुर्दकडून वाशीकडे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करून ही मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top