वाशिमच्या बाजारात भाज्यांचे दर कडाडले

वाशीम- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत असल्याने वाशिमच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजी घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका बसला आहे. टोमॅटो दर १०० रुपये किलो, तर वाटाणा २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. शेतकर्‍यांना मात्र या दरवाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकवर चांगलाच परिणाम झाला आहे.शेतातून भाजीपाला भाजी मार्केटपर्यंत कमी प्रमाणात येत असल्याने सध्या भाजीपाला दरात वाढ झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top