मुंबई – वांद्रे वरळी सी-लिंकवर आज दुपारी ५ गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे सी लींकवर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर वरळी पोलिसांसह वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. वरळी पोलिसांकडून अपघात झालेल्या गाड्यांना हटवण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
