कॅनबेरा – पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम हे सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. अक्रम यांनी आपल्या पाळीव मांजराचा ऑस्ट्रेलियामध्ये हेअरकट करून घेण्यासाठी तब्बल ५५ हजार रुपये खर्च केले. अक्रम यांनी स्वतःच सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली.मांजराचा हेअरकट करण्याआधी त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रण्यांचे डॉक्टर, नर्स होते. हेअरकट करुन झाल्यानंतर मांजराला त्यांनी चांगले खाऊ घातले. या एकूण सुविधा आणि हेअरकट याचा ५५ हजार रुपये खर्च आला असे सांगताना या पैशांमध्ये पाकिस्तानमध्ये दोनशे मांजरे सहज विकत घेता आली असती,असा टोला त्यांनी लगावला आहे.
