पॅरिस- सुप्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू सेलेना विल्यम्स व तिच्या कुटुंबियांना पॅरिस मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कृष्णवर्णीय असल्यामुळे तिला प्रवेश नाकारण्यात आल्याचे म्हटले जात आहे.सेरेने विल्यम्स हिने आपल्या एक्स अकाऊंटवर एक संतप्त पोस्ट लिहून प्रवेश नाकारल्याचे म्हटले आहे. पॅरिसमधील एका पंचतारांकित हॉटेलच्या रुफटॉपवर असलेल्या रेस्टॉरण्टमध्ये सेरेना विल्यम्स आपल्या कुटुंबियांसह गेली असता हॉटेलच्या व्यवस्थापनाने तिला प्रवेश नाकारला. हे रेस्टॉरण्ट रिकामे असतांनाही आपल्याला प्रवेश का नाकारला असेही सेरेनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सेरेनाच्या या पोस्टवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून वंशवादी वर्तनाबद्दल हॉटेलचा निषेध केला. सेरेना विल्यम्सच्या या पोस्टवर हॉटेलने दिलगिरी व्यक्त करणारी प्रतिक्रीया दिली असून रुफटॉपचे रेस्टॉरण्ट हे एका ग्राहकाने पूर्णपणे आरक्षित केले असल्याने आपल्याला प्रवेश देता आला नाही असे म्हटले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |