‘वंदे भारत ट्रेन ‘मधील जेवणात झुरळ!

जबलपूर- वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मार्फत रेल्वे प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या पॅकबंद जेवणात हे झुरळ आढळले.वंदे भारत एक्स्प्रेसने राणी कमलापती ते जबलपूरला जाणाऱ्या एका प्रवाशाला हा विचित्र अनुभव आला.

या प्रवाशाने जबलपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पश्चिम मध्य रेल्वेकडे अधिकृत तक्रार नोंदवली. दोन दिवसांनंतर त्या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर या घटनेची माहिती दिली.या प्रवाशाने आपल्या पॅकबंद अन्नाचे फोटो शेअर केले. प्रवाशाने आयआरसीटीसी, रेल्वे मंत्री आणि अगदी पंतप्रधानांनाही टॅग केले. आयआरसीटीसीने देखील या पोस्टला तत्काळ उत्तर दिले की, या अनुभवाबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधितांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top