लासलगावमार्गे कोकणातील हापूस थेट अमेरिकेत दाखल

नाशिक – आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने अवघ्या जगावर राज्य करणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याची अमेरिकावारी सुरू झाली आहे.लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून हापूस आंबा निर्यात होत आहे. ७५०० बॉक्समधून २८ टन हापूस अमेरिकेला पाठवला असल्याची माहिती लासलगाव कृषक संस्थेचे अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

गेल्यावर्षीही लासलगावच्या कृषकमधून १ हजार टन आंबा अमेरिकेला निर्यात केला होता.गेल्या १५ वर्षांपासून कोकणचा राजा हापूस लासलगावमार्गे अमेरिका,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया देशात पाठविला जात आहे.लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रातून अल्फान्सो,केशर,बदाम,राजापुरी,मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने हा आंबा आता अमेरिकेचा दिशेने कूच करू लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top