लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

पाटना – राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालूप्रदास यादव यांची प्रकृती खालावली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. त्यांच्या निवासस्थानी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यानंतर आज दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने लालू यांना उपचारासाठी दिल्लीला हलवले.
गरदानीबागमध्ये २६ मार्चला लालूप्रसाद यादव वक्फ दुरुस्ती विधेयकाविरुद्ध निषेध आंदोलनात तेजस्वी यादव यांच्यासोबत सहभागी झाले होते. त्यानंतर ते जाहीर कार्यक्रमात फारसे दिसले नाहीत.