लाँचआधीच समोर आले Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर्स आणि किंमत, 200MP कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही

सॅमसंग लवकरच त्यांची लोकप्रिय S स्मार्टफोन सीरिजचे नवीन डिव्हाइस लाँच करणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी 22 जानेवारीला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनला लाँच करेल. मात्र, लाँचआधीच या फोनची किंमत आणि फीचर्स समोर आले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy S25 Ultra चे डिझाइन आणि फीचर्स

Samsung Galaxy S25 Ultra चे डिझाइन आधीच्या मॉडेलप्रमाणेच असेल. फोनमध्ये देण्यात आलेले बॉक्सियर डिझाइन याला वेगळा लूक देते. फोनमध्ये WQHD+ रिझॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारी 6.9 इंच फ्लॅट स्क्रिन मिळेल. कंपनीकडून फोनसोबत येणाऱ्या एस-पेनमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली जाणार नाही. ज्यामुळे जेस्चर व रिमोट कंट्रोल सारखी सुविधा यूजर्सला मिळणार नाही.

फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात गॅलेक्सी ए24 अल्ट्राप्रमाणेच क्वाड-कॅमेरा सेटअप दिला जाईल. यामध्ये 200 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 10 मेगापिक्सलची 3एक्स टेलिफोटो लेन्स आणि  50 MP ची पेरिस्कोप झूम लेन्स मिळेल. फोनमध्ये अपग्रेडेड 50 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस दिली जाईल. नवीन कॅमेरा सेटअपमुळे शानदार व्हीडिओग्राफी अनुभव प्राप्त होईल.

कंपनी फोनला स्नॅपड्रॅगन 8 एलीट, 12 जीबी रॅम आणि 1 जीबी स्टोरेजसह सादर करू शकते. हा फोन Android 15-बेस्ड OneUI 7 सह येईल. यामध्ये यूआय आणि नवीन गॅलेक्सी एआय फीचर्स मिळेल. जुन्या मॉडेलप्रमाणेच एस25 मध्ये वायरलेस आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत

कंपनी Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनला 1 लाख 20 हजार ते 1 लाख 30 हजार रुपये किंमतीत लाँच करू शकते. मात्र, लाँचिंगनंतरच फोनची अधिकृत किंमती समोर येईल.