रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर देखील रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top