Game Changer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपट रिलीज झाला आहे. मात्र, रिलीजनंतर अवघ्या काही तासातच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे समोर आले. अनेक ऑनलाइन वेबसाइटवर या चित्रपटाची कॉपी उपलब्ध झाली आहे. निर्मात्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळे चित्रपटला बॉक्स ऑफिसवर मोठा फटका बसू शकतो.
‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपटामध्ये राम चरणसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. रिलीजनंतर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर काही चाहते राम चरणच्या अभिनयाचे देखील कौतुक करत आहेत.
राम चरणचे (Ram Charan) चाहते ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर 10 जानेवारी 2025 ला हा चित्रपट रिलीज झाला. RRR नंतर 4 वर्षांनी राम चरण या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर परतला आहे. मात्र, चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन ऑनलाइन लीक झाले.
चित्रपटाची पायरेटेड कॉपी तमिलरॉकरज, फिल्मीजिला, मूवीरुलेजज, टेलिग्रॅमसह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. भारतात पायरसी करणे गुन्हा असले तरीही अनेक चित्रपटांबाबत हे घडताना पाहायला मिळते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि कियारा आडवाणीसोबतच अंजली, वेनेला किशोर, नवीन चंद्र, समुथिरकानी, श्रीकांत, प्रकाश राज, सुनील आणि जयरामसह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एक पॉलिटिकल ड्रामा असून, यात राम चरणने डबल रोल साकारला आहे.