मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर केला. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ६.५० टक्के आहे. रिझर्व्ह बँकेने हा दर सलग नऊ वेळा आहे तेवढाच ठेवला आहे. रिझर्व्ह बँक सर्व बँकांना ज्या व्याज दराने कर्ज देते त्याला रेपो दर म्हणतात. पतधोरण समितीच्या बैठकीत विकासाचा दर ७.२ टक्क्यांवरच राहणार असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.यावर्षी पर्जन्यमान सर्वसाधारण राहणार असल्याचे गृहित धरून अन्नधान्याची दरवाढ ४.५ टक्के राहण्याचा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
