मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपाची पिच्छेहाट करण्यात यशस्वी झालेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी प्रथमच १४ जुलैच्या रविवारी आषाढीच्या वारीत सहभागी होणार आहेत. या वारीत राहूल गांधी यांना कुठलीली विशेष वागणूक देण्यात येणार नसून ते साधेपणानेवारीत चालणार आहेत,अशी माहिती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानभवनाबाहेर बोलताना दिली.
काही दिवसांपूर्वीच खासदार शरद पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सुरेश उर्फ बाळ्या मामा पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांनी राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहूल गांधी वारीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहूल गांधी १४ जुलैला प्रथमच आषाढीच्या वारीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.