राष्ट्रपती मुर्मू यांचा दिल्ली मेट्रोने प्रवास

नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पहिल्यांदाच दिल्ली मेट्रोने प्रवास केला. राष्ट्रपतींचा प्रवास करतानाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी सतर्क उभे असल्याचे दिसत आहे. डीएमआरसीचे उच्च अधिकारी राष्ट्रपती मुर्मू यांना मेट्रोच्या कामकाजाची माहिती देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top