रायगड
भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर सर्वाधिक असतो. मात्र सध्या जिल्हयात पावसाचा जोर कमी आहे. जिल्हयात काही भागात पावसाच्या तुरळक सरी होत आहे. दरम्यान जिल्हयात आता खरिपाची भात लागवड सुरु झाली आहे. दक्षिण रायगडमध्ये काही ठिकाणी भात लावणी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.
