राज ठाकरे दिल्लीतील शपथविधीला अनुपस्थित

नवी दिल्ली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शपथविधीला अनुपस्थित राहिले. त्यांना निमंत्रण देण्यात आले होते , मात्र त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर मुंबईच्या सभेतही ते नरेंद्र मोदी यांच्या बरोबर एकाच व्यासपीठावर होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. स्वतः राज ठाकरे यांनीही नारायण राणेंसाठी सिंधुदुर्गात, नरेश म्हस्केंसाठी ठाण्यात व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण मतदारसंघात , भाजपा उमेदवार कोटेचा यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे राज ठाकरे यांना या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शपथविधीसाठी आवर्जुन बोलावण्यात आले होते. मात्र राज ठाकरे यांचे आजचे कार्यक्रम हे आधीच ठरले असल्यामुळे ते आजच्या शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top