राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची वांद्रयात आज बैठक

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची वांद्रयातील एमआयजी क्लबमध्ये आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाचे सरचिटणीस हजेरी लावणार आहेत.
मागील बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर २०० ते २२५ जागा लढविणार असल्याची घोषित केली होती. पदाधिकार्‍यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी लवकरच निरिक्षकांच्या नेमणुका करण्यात येतील, असेही राज ठाकरेंनी बैठकीत सांगितले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्या मनसेची बैठक बोलावली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top