पुणे
उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे ऐन थंडीत राज्यात पावसास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागांत पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.होसाळीकर यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे की, गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गुरूवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तर शुक्रवारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आ