राज्यात लहान माशांच्या खरेदी – विक्रीस निर्बंध

मुंबई – राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याची खरेदी विक्री करणे यावर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. या प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी मासळी बाजारांमध्ये फलकही लावण्यात येणार आहेत.

पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने ५८ प्रजातीच्या माशांच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केलेली आहे. यासाठी कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या २ नोव्हेंबर २०२३ च्या आदेशाने ५४ प्रजातीच्या किमान आकारमानाचे कायदेशीर विनियमन केलेले आहे.