राज्यात उन्हाचा चटका तापमानाचा पारा ४२ अंशावर

मुंबई :

राज्यात उकाडा वाढू लागला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. कोरड्या हवामानामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून उद्यापासून राज्यात पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात सध्या निरभ्र आकाश आहे. नागरिकांना दिवसा उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. काळपासूनच उन्हाचा चटका वाढत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. मुंबईतील उपनगरात किमान तापमान २३ सेल्सिअस आणि कमाल तापमान ३४ सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. बह्मपुरी, मध्य महाराष्ट्रातील जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे पारा ४२ अंशांच्या वर गेला आहे.

तापमानाचा पारा

पुणे (३९.८), अहमदनगर (३८.९), धुळे (४०.०), जळगाव (४०.२), जेऊर (४२.०), कोल्हापूर (३८.६), महाबळेश्वर (३३.१), मालेगाव (४२.०), नाशिक (३८.२), निफाड (३७.८), सांगली (४०.५), सातारा (३९.२), सोलापूर (४२.०), सांताक्रूझ (३२.९), डहाणू (३३.६), रत्नागिरी (३२.७), छत्रपती संभाजीनगर (३८.६), बीड (४०.७), नांदेड (४०.२), परभणी (४०.५), अकोला (४१.८), अमरावती (४०.८), बुलडाणा (३८.०), ब्रह्मपुरी (४२.३), चंद्रपूर (४१.२), गडचिरोली (४०.६), गोंदिया (३९.८), नागपूर (४१.२), वर्धा (४१.५), वाशीम (४१.४), यवतमाळ (४१.२)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top