राज्याच्या पहिल्या शाश्वत विकास परिषदेचे कोल्हापुरात आयोजन

कोल्हापूर – उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्या राज्यातील पहिलीच शाश्वत विकास परिषद २५ जून रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
मित्रा या संस्थेच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आलेल्या योजनांपैकी शाश्वत विकास परिषद ही एक योजना आहे.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. या शाश्वत विकास परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि पर्यटन विभाग यांचे प्रधान सचिव, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top