जयपूर- राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. एका एसयुव्ही व ट्रकमध्ये धडक होऊन हा अपघात झाला.
चुरु जिल्ह्यातील चुरु हनुमानगढ मेगा हायवेवर सरदारशहर जवळ हा अपघात झाला. सरदारशहर हून हनुमानगढ ला जाणारी एसयुव्ही गाडी एका ट्रकला धडकून झालेला हा अपघात इतका भीषण होता की एसयुव्हीमधील मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढावे लागले. या अपघातात ट्रक चालकाचाही मृत्यू झाला असून जखमी झालेल्या दोघांना चुरुच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.