रशियन हेर देव माशाचा नॉर्वेच्या खाडीत मृत्यू

मॉस्को – रशियन हेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्लाल्दिमिर’ या देवमाशा (व्हेल)चा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना या पांढऱ्या व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला.

या व्हेलचे १४ फूट लांब व्हेलचे वय सुमारे १५ वर्षे होते. तर वजन १, २२५ किलो होते. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसून मोठ्या बोटीच्या धडकेने हा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्याचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला.

‘व्लाल्दिमिर’चा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या व्हेलची माहिती जगाला २०१९ मध्ये सर्वप्रथम मिळाली होती. रशियापासून ४१५ किमी अंतरावर नॉर्वेमधील इंगोया बेटाच्या किनाऱ्यावर तो दिसला होता. या भागात बेलुगा व्हेल आढळत नाहीत. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले.

या व्हेलची जवळून पाहणी केल्यावर त्याच्या गळ्याभोवती एक पट्टा दिसला. त्याच्यावर सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे नाव लिहिले होते. त्याच्या शरीरावर कॅमेरा आणि इतर काहीदेखील बसवण्यात आली होती. त्यामुळेच तो रशियाचा गुप्तहेर व्हेल म्हणून ओळखला जाऊ लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top