रशियन सैन्यातील १७ भारतीय बेपत्ता

नवी दिल्ली- रशिया-युक्रेन युद्धात काही भारतीयांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.या पार्श्‍वभूमीवर
रशियन सशस्त्र दलातील १८ भारतीय आहेत त्यापैकी १६ बेपत्ता असल्याची माहिती रशियाने दिली आहे,असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

सरकारला रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या एकूण भारतीयांची माहिती आहे का आणि असल्यास त्यांचा तपशील आहे का? असे विचारण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयाला असेही विचारण्यात आले होते की, ज्या भारतीय नागरिकांची सुटका केली आहे, त्यांना भारतात कधी आणले जाणार आहे? यावर कीर्तीवर्धन सिंह म्हणाले, “उपलब्ध माहितीनुसार, रशियन सशस्त्र दलात १२७ भारतीय नागरिक होते, त्यापैकी ९७ जणांच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.