यूएईमधून होणारी सोने-चांदीची आवक २१० टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली- मुक्त व्यापार करार भागीदार असलेल्या यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात होणार्‍या सोन्या-चांदीच्या आयातीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये आयात तब्बल २१० टक्क्यांनी वाढून १०.७ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे.या व्यापाराला आणखी चालना देण्यासाठी सीमा शुल्क दरांमध्ये सुधारणा करण्याची गरज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह म्हणजेच जीटीआरआयच्या अहवालात म्हटले आहे.

ही आयात वाढण्यामागील एक कारण आयात शुल्क आहे.यूएईला आर्थिक भागीदारी करारानुसार भारताने आयात शुल्क सवलत दिली आहे. जीटीआरआयच्या अहवालानुसार, भारत अमर्यादित प्रमाणात चांदीच्या आयातीवर सात टक्के शुल्क किंवा सीमा शुल्क सवलत देते आणि १६० मेट्रिक टन सोन्याच्या आयातीवर एक टक्के सवलत देते.भागीदारी करारावर फेब्रुवारी २०२२ मध्ये स्वाक्षरी करण्यात आली आणि मे २०२२ मध्ये ती अंमलात आली. तसेच गिफ्ट सिटीमधील इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजद्वारे खाजगी कंपन्यांना यूएईमधून आयात करण्याची परवानगी देऊन भारत सोने आणि चांदीची आयात सुलभ करतो.यापूर्वी केवळ अधिकृत एजन्सीच अशी आयात हाताळू शकत होत्या.या अहवालात म्हटले आहे की सोने आणि चांदीची आयात २१० टक्क्यांनी वाढून ३.५ अब्ज डॉलरवरून १०.७ बिलियन डॉलर इतकी झाली आहे. उर्वरित सर्व उत्पादनांची आयात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४९.७ अब्ज डॉलरवरून २५ टक्क्यांनी घसरून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३७.३ अब्ज डॉलरवर आली आहे.

दरम्यान, जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी म्हटले आहे म्हणाले की,यूएईमधून होणारी सोने आणि चांदीची सध्याची आयात दीर्घकाळ राहणारी नाही.कारण त्याठिकाणी कुठेही सोने किंवा चांदीची खाण नाही किंवा उत्पादन होत नाही.मात्र भारतातील सोने, चांदी आणि दागिन्यांवर १५ टक्के जास्त आयात शुल्क हे समस्येचे मूळ कारण आहे. ते कमी करून पाच टक्के केले पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top