युक्रेनमध्ये लढणाऱ्या आमच्या पतींना परत बोलवा! सैनिक पत्नींची मागणी

मॉस्को –
निषेध करत आहेत. युक्रेनविरोधात युद्ध लढणाऱ्या सैनिकांना युक्रेनमधून माघार बोलवा, अशी त्यांची मागणी करत रशियामध्ये सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीयांनी काल आंदोलन केले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या २० लोकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यापैकी बहुतांश पत्रकार आहेत. काही मानवी हक्क कार्यकर्त्यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

काल सकाळपासून या निदर्शनांना सुरुवात झाली. रशिया-युक्रेन युद्धाच्या ५०० व्या दिवशी, सैनिकांचे नातेवाईक अज्ञात सैनिकांच्या स्मारकावर जमले. क्रेमलिन या रशियन राजप्रसादाच्या बाहेर सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले हे स्मारक आहे. त्यांनी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. क्रेनमध्ये लढत असलेल्या सैन्याच्या माघारीसाठी निदर्शने केली.

द वे होम ग्रुपच्या सांगण्यावरून हे निदर्शने सुरू झाली आहेत. या गटाने टेलिग्राम वाहिनीवरील सैनिकांच्या पत्नी, बहिणी आणि मातांना सैनिकांच्या परतीसाठी आवाज उठवण्यास सांगितले. रशियन सैनिकांचे दीर्घकाळ युद्धभूमीवर पाठवणे आणि त्यासाठी कुठेलीही रोटेशन पद्धत न वापरणे याला सैनिक पत्नीचा विरोध आहे. याविरोधात सैनिक पत्नी सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकत आहेत.

एका सैनिकाची पत्नी म्हणाली की, माझा नवरा जिवंत राहावा अशी माझी इच्छाआहे. त्याच्या जिवाच्या बदल्यात मला सरकारकडून कोणतीही भरपाई नको आहे. मला फक्त माझा नवरा परत हवा आहे.

युद्धात जखमी झालेल्या रशियन सैनिकांना नुकसानभरपाई दिली जात नसल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. ४५ वर्षीय ओलेग रायबकिन सप्टेंबर २०२२ मध्ये युक्रेनविरुद्धच्या युद्धात सरहभागी झाला होता. जून २०२३ मध्ये तो जखमी झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे यकृत आणि किडनीवरही परिणाम झाला. रशियन सैन्याने त्याला लढण्यास अयोग्य घोषित केले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईची मागणी केली, तेव्हा सरकारने भाजीपाल्याची पोती त्याच्या घरी पाठवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top