यागी चक्रीवादळाचा तडाखा व्हिएतनाममध्ये १४ बळी

हनोई – यागी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा व्हिएतनामला बसला असून त्यामुळे देशात १४ जणांचा बळी गेला आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले .व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला काल यागी चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. चक्रिवादळाने झालेल्या पडझडीत १७६ जण जखमी झाले आहेत. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली आहे. चक्रीवादळामुळे १ लाख १६ हजार १९२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले . शहरे पाण्याखाली गेली असून अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली. तर चार विमानतळ पूर्णपणे ठप्प झाले. देशातील अनेक भागातील वीजपुरवठाही बंद पडला असून गेल्या दशकातील हे सर्वात मोठे चक्रीवादळ होते. चक्रीवादळामुळे क्व्यांग निन्ह व हायपोंग प्रांतातील अनेक झाडे कोसळली. या भागात ताशी १४९ किलोमीटर वेगाने तब्बल पंधरा तास वादळी वारे वाहत होते. वाऱ्यामुळे अनेक झाडे व वीजेच खांब कोसळले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top