यंदा सर्वपित्री अमावस्येला वर्षातील दुसरे सूर्यग्रहण !

मुंबई- यंदाच्या २०२४ सालातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी लागले होते. आता यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण बुधवार २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्येदिवशी लागणार आहे.हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

पंचांगाप्रमाणे २ ऑक्टोबर रोजी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री दर्श अमावस्या आहे.यादिवशी सूर्यग्रहण रात्री ९.१३ वाजता सुरू होईल आणि ३.१७ वाजता सुटेल. या ग्रहणाचा कालावधी ६ तासांचा असून हे ग्रहण कंकणाकृती असणार आहे.त्यामुळे सूर्याभोवती रिंग असणार आहे.हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने ग्रहणाचा सुतक काळ पाळण्याची गरज नाही.तसेच यावेळी धार्मिक पूजा विधिवर कोणतेही बंधन नसेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *