मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर १ एप्रिल रोजी मुंबईत येणार

मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीचे धामधूम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत, मात्र यावेळी त्यांचा दौरा राजकीय नसून १ एप्रिल रोजी ते मुंबईत येणार आहेत. यावेळी ते रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२४ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), नरिमन पॉइंट, मुंबई येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. मोदींचा गेल्या २ महिन्यातील हा चौथा महाराष्ट्र दौरा आहे. यापूर्वी ते अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top