न्युयॉर्क – इलोन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने मानवी मेंदूत चिप बसवण्याची दुसरी शस्त्रक्रियाही यशस्वी केली आहे. या चिपच्या माध्यमातून मेंदू कमकुवत असणार्या व्यक्तीला विचार करणयाची शक्ती मिळू शकते. या चिपच्या मदतीने व्हिडिओ गोम खेळणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे, लॅपटॉपवर कर्सर हलवणेही शक्य होणार आहे. जुलै महिन्यात पहिल्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिच्यापेक्षा चांगले परिणाम दुसर्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेत दिसत आहेत. या वर्षी आणखी ८ रुग्णांच्या मेदूत या चिप बसवण्यात येणार आहेत.