मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार, 2027 पर्यंत पूर्ण होणार 1100 कोटी रुपयांचा उड्डाण पूल

Palette Creation
+91 9930666001

———- Forwarded message ———
From: officialmarathiwriter <officialmarathiwriter@gmail.com>
Date: Mon, 17 Feb 2025 at 8:53 PM
Subject: Navakal Articles – 17/2/25
To: <palettec.ind@gmail.com>
Cc: Raamesh Gowri Raghavan <iambecomedeath@gmail.com>, <rohit@navakal.in>

1. एका क्लिकवर पाहा IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी खेळला जाणार तुमच्या आवडीच्या संघाचा सामना?

IPL 2025 Schedule : क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीसीसीआयकडून आयपीएलच्या 18व्या सीझनचे वेळापत्रक जाहीर केले असून, या स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर 25 मे ला अंतिम सामना खेळला जाईल.

22 मार्चला पहिला सामना गतवर्षीचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. यावर्षी एकूण 10 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. तसेच, एकूण 74 सामने यात खेळले जाणार आहेत.

65 दिवस खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन 13 वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. टॉप दोन संघांमध्ये पहिली पात्रता फेरी 20 मे ला, तर बाद फेरी 21 मे ला हैदराबादमध्ये होईल. दुसरी पात्रता फेरी 23 मे ला कोलकात्यात होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 25 मे ला कोलकात्यातच रंगणार आहे.

आयपीएल 2025 संपूर्ण वेळापत्रक

1. 22 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (कोलकाता) 

2. 23 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs राजस्थान रॉयल्स (हैदराबाद) 

3. 23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स (चेन्नई) 

4. 24 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs लखनौ सुपर जायंट्स (विशाखापट्टणम) 

5. 25 मार्च – गुजरात टायटन्स vs पंजाब किंग्स (अहमदाबाद)

6. 26 मार्च – राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (गुवाहाटी) 

7. 27 मार्च – सनरायझर्स हैदराबाद vs लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद) 

8. 28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (चेन्नई) 

9. 29 मार्च – गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स (अहमदाबाद) 

10. 30 मार्च – दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद (विशाखापट्टणम) 

11. 30 मार्च – राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स (गुवाहाटी) 

12. 31 मार्च – मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स (मुंबई) 

13. 1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्स (लखनौ) 

14. 2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs गुजरात टायटन्स (बेंगळुरू) 

15. 3 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता) 

16. 4 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स (लखनौ) 

17. 5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई) 

18. 5 एप्रिल – पंजाब किंग्स vs राजस्थान रॉयल्स (न्यू चंदीगड) 

19. 6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स (कोलकाता) 

20. 6 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स (हैदराबाद) 

21. 7 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (मुंबई) 

22. 8 एप्रिल – पंजाब किंग्स vs चेन्नई सुपर किंग्स (न्यू चंदीगड) 

23. 9 एप्रिल – गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स (अहमदाबाद) 

24. 10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू) 

25. 11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई) 

26. 12 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स (लखनौ) 

27. 12 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs पंजाब किंग्स (हैदराबाद) 

28. 13 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (जयपूर) 

29. 13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स (दिल्ली) 

30. 14 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्स (लखनौ)

31. 15 एप्रिल – पंजाब किंग्स vs कोलकाता नाईट रायडर्स (न्यू चंदीगड) 

32. 16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स (दिल्ली) 

33. 17 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद (मुंबई) 

34. 18 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs पंजाब किंग्स (बेंगळुरू) 

35. 19 एप्रिल – गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स (अहमदाबाद) 

36. 19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स (जयपूर) 

37. 20 एप्रिल – पंजाब किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (न्यू चंदीगड) 

38. 20 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स (मुंबई) 

39. 21 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs गुजरात टायटन्स (कोलकाता) 

40. 22 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स (लखनौ) 

41. 23 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स (हैदराबाद) 

42. 24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs राजस्थान रॉयल्स (बेंगळुरू) 

43. 25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद (चेन्नई) 

44. 26 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्स (कोलकाता) 

45. 27 एप्रिल – मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स (मुंबई) 

46. 27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (दिल्ली) 

47. 28 एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स (जयपूर) 

48. 29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स (दिल्ली) 

49. 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स (चेन्नई) 

50. 1 मे – राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स (जयपूर) 

51. 2 मे – गुजरात टायटन्स vs सनरायझर्स हैदराबाद (अहमदाबाद) 

52. 3 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्स (बेंगळुरू) 

53. 4 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स (कोलकाता) 

54. 4 मे – पंजाब किंग्स vs लखनौ सुपर जायंट्स (धर्मशाळा) 

55. 5 मे – सनरायझर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स (हैदराबाद) 

56. 6 मे – मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स (मुंबई) 

57. 7 मे – कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्स (कोलकाता) 

58. 8 मे – पंजाब किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स (धर्मशाळा) 

59. 9 मे – लखनौ सुपर जायंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (लखनौ) 

60. 10 मे – सनरायझर्स हैदराबाद vs कोलकाता नाईट रायडर्स (हैदराबाद) 

61. 11 मे – पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स (धर्मशाळा) 

62. 11 मे – दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स (दिल्ली) 

63. 12 मे – चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स (चेन्नई) 

64. 13 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद (बेंगळुरू) 

65. 14 मे – गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स (अहमदाबाद) 

66. 15 मे – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (मुंबई) 

67. 16 मे – राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्स (जयपूर) 

68. 17 मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs कोलकाता नाईट रायडर्स (बेंगळुरू) 

69. 18 मे – गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद) 

70. 18 मे – लखनौ सुपर जायंट्स vs सनरायझर्स हैदराबाद (लखनौ) 

71. 20 मे – पात्रता फेरी 1 (हैदराबाद) 

72. 21 मे – बाद फेरी (हैदराबाद) 

73. 23 मे – पात्रता फेरी 2 (कोलकाता) 

74. 25 मे – अंतिम सामना (कोलकाता) 

Tags – IPL 2025 Schedule, IPL

2. मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान होणार, 2027 पर्यंत पूर्ण होणार 1100 कोटी रुपयांचा उड्डाण पूल

MTHL & Mumbai-Pune Expressway: मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक (MTHL) आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाण पूल प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 1,100 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) केली आहे. 

या प्रकल्पामध्ये MTHL च्या चिर्ले टोकापासून गव्हाण फाट्यापर्यंत आणि दुसरा पळस्पे फाट्यापासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापर्यंत अशा दोन उड्डाण पुलांचा समावेश आहे. विशेषतः JNPT वरून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीमुळे NH-348 वर होणारी वाहतूक कोंडी कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

JNPT–पनवेल राष्ट्रीय महामार्गावर (NH-348) चिर्ले ते गव्हाण फाटा दरम्यान 6 लेनचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व्हिस रोडचे पुनर्निर्माण देखील करण्यात येणार आहे.

याशिवाय, रायगड जिल्ह्यात जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH-48) लगत आणखी एक सहा लेनचा कॉरिडॉर बांधला जाईल आणि NH-48 ला सहा लेनमध्ये विस्तारित केले जाईल.

या प्रकल्पासाठी जवळपास 1,102.75 कोटी रुपये खर्च येणार आहे. चिर्ले सेक्शनमधील उड्डाण पुलाची लांबी 4,958 मीटर असेल, तर पलास्पे सेक्शनची लांबी 1,700 मीटर असेल. या कॉरिडॉरमुळे अटल सेतु आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांचा एकत्रीकरण होईल, ज्यामुळे या मार्गावर प्रवास करणे अधिक सुरळीत होणार आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवास सोपा होईल आणि क्षेत्रातील आर्थिक वृद्धीला चालना मिळणार आहे.