मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस वाहतूक मार्गात बदल

Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक असणार आहे. 22, 23, आणि 24 जानेवारी या तीन दिवशी हा ब्लॉक असेल. या तिन्ही दिवशी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरावरील (Mumbai Pune Expressway) कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) नवीन पुलाचे पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) 22, 23, आणि 24 जानेवारी वाहतूक वळवण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

तीन दिवस मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. दुपारी 3 नंतर वाहतू पुन्हा एकदा चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहील.

वाहनचालकांना कोणतीही समस्या आल्यास त्यासाठी संपर्क क्रमांक देखील जारी करण्यात आली आहे. वाहन चालकांना कोणतीही अडचण आल्यास ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 या नंबरवर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या नंबरवर संपर्क करू शकतात.