मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अवजड वाहनांना बंदी

पुणे :

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर महामार्ग पोलिसांनी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणा-या लेनवर उद्यापासून ९ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. याची नोंद वाहतूकदारांनी घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

उन्हाचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांचे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. तसेच वाहनांचे इंजिन गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. या घटनांमुळे वाहतुक ठप्प होते. या घटना टळाव्यात व मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना ६ एप्रिल ते ९एप्रिल पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहन मालक, चालक संघटनांना शनिवार ते मंगळवार पर्यंत अवजड वाहने पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आणू नयेत, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top