मुंबईत ३६ ठिकाणी मतमोजणी सकाळी ८ वाजता प्रक्रिया सुरू

मुंबई- विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उद्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २७०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्रॉग रूममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व पोलीस तैनात आहेत.हे सर्व स्ट्रॉग रूम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत. उद्या मुंबईतील मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटरपर्यंत गर्दी करण्यास बंदी घातली आहे.मुंबईचे पोलीस उपायुक्त व प्रवक्ते अकबर पठाण यांनी हे आदेश जारी केले आहेत. मुंबईतील निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आजही दुसर्‍यांदा प्रशिक्षण देण्यात आले.याआधी १५ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा प्रशिक्षण देण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top